नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या शिवसेनेत प्रवेश…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांगले काम करत आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे,” असे शिवसेना पक्षप्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनानप्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
नीलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही अवधी उलटला नसतानाच भाजपकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा ठराव मांडला आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रविण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. तर प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहेउपसभापती नीलम गोऱ्हे या पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते असताना प्रवीण दरेकर यांनी केला होता. यानंतर त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा, असा प्रस्ताव प्रविण दरेकर यांनी मांडला आहे.
शिवसेनेत मला खूप दिले आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे.
केंद्रीय स्तरावर NDA आणि भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारने विविध विषयांवर सकारात्मक पावले उचलली आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शाहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे.
मी उपसभापती असल्यामुळे त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार