पीएम केअर फंडातल्या पैशाचे काय झालं हे देखील जनतेला कळले पाहिजे- उध्दव ठाकरे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -कोविड काळातला भ्रष्टाचार काढा, पण कोरोनाने ग्रासल असताना मुंबईने जगासमोर एक आदर्श ठेवला होता. जगाने त्याचे कौतूक केले होते. पण जग कौतुक करत असताना, तुमच्यात कौतुक करण्याइतपत मोठेपण हवा ना. दुसरा जर चांगल करत असेल तर, चांगल्याला चांगलं म्हणायला माणुसकी लागते. पण जर आपल्यातला माणूसच मेला असेल, तर कौतूकाची अपेक्षाच नाही अशी टीका देखील ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं वर केली आहे.

तसेच कौतुक करता येत नसेल तर बदनामी तरी करू नका असंही ठाकरे म्हणाले.पीएम केअर फंडातील जनतेच्या पैशाचे काय झाले, हे देखील कळले पाहिजे, हा पैसा घेतला कोणी होता आणि वापरला कशासाठी होता. लाखो-करोडो रूपये तिकडे गोळा केले गेले.

हा घोटाळा नाही होऊ शकत. आता म्हणतात तो पीएम केअर फंड सरकारी नाही, मग नेमका आहे कुणाचा? असा सवाल देखील ठाकरेंनी केलापीएम केअर म्हणजे मी मध्ये बोललो होतो, प्रभाकर मोरे फंड आहे का? वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठे? असा तो फंड आहे का, तर तसाही नाही आहे, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.

एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा, एकत्र भारत म्हणून जो लढा दिला.त्यात मुंबईचे जगात कौतुक होत असताना, त्याला अपशकुनी करणाऱ्या या अपशकुनी मामांचा विचार करण्याची वेळ आली आहे असे देखील ठाकरे म्हणाले आहेत

.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता.यानंतर आता मुंबईतील कथित कोरोना सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई करताान १६ ते १७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत कोट्यवधीचं घबाड आणि महत्वाची कागदपत्रं ईडीच्या हाती लागले होते.

यामुळे महापालिका अधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या नेतेमंडळींचेही धाबे दणाणले आहेत. याचदरम्यान, आता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले, कोविड काळातला भ्रष्टाचार काढा, पण पीएम केअर फंडातल्या पैशाचे काय झालं हे देखील जनतेला कळले पाहिजे. वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठे? असा सवाल ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे