आमदार नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा- तृतीयपंथी


पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी तृतीयपंथींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात तृतीपंथीयांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी रात्री उशिरा ठिय्या आंदोलन सुरू केले. नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनास पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्तेही सहभागी झाले होते.परंतु गुन्हा दाखल होत नसल्यामुळे तृतीपंथीयांनी आक्रमक होत बुधवारी बंडगार्डन चौकातील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून दूर करताना पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. महिला पोलिसांनी तृतीपंथीयांना अक्षरशः फरफटत नेत पोलिस ठाण्यात नेलेभाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तृतीयपंथीयांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टवरून आक्रमक झालेल्या तृतीयपंथीयांनी बंडगार्डन पोलिस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले. तृतीयपंथीयांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे पोलिस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाली. या वेळी पोलिसांनी तृतीयपंथीयांना फरफटत नेले.अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दरम्यान, तृतीयपंथीयांनी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात एकत्र येत राणेंच्या ट्विटचा निषेध केला. तसेच त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेला समुदाय स्वत:च्या हक्कांसाठी संघर्ष करीत आहे. अशा वेळी हे नेते आमची बाजू घेताना दिसत नाहीत. याउलट तृतीयपंथी शब्दाचा वापर करतात. यातून त्यांचे मागासलेले विचार आणि मानसिकता दिसून येते.- शमिभा पाटील (राज्य समन्वयक तृतीयपंथी हक्क संघर्ष समिती).
आंदोलनस्थळी भेट देवून तृतीयपंथीयांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यांचे निवेदन मुंबई शहर पोलिस दलाकडे पाठविण्यात येणार आहे.
– प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त.