सत्ता पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला – आमदार बच्चू कडू


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
देशात पहिल्यांदाच असं मंत्रालय तयार झालं. ही माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळं हे दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. या भेटीसाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेन त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.सत्ता पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. लोकांची यामागे पाहण्याची भूमिका विचित्र आहे. याला स्थिरता यायला पाहिजे. लोक आमच्यावर आरोप आणि चारित्र्य हनन करत आहेत.सध्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या धावपळीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेत आपण यासाठी आग्रही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली, तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आपण त्यांचा गुलाम म्हणून काम करेन अशी अजब घोषणाही केली मविआ सरकारमध्ये आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं दिव्यांग मंत्रालय स्थापण्याबाबत मागणी केली होती. पण ते काही झालं नाही जर ते झालं असतं तर आम्हाला गुवाहाटीला जायची गरज पडली नसती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिलं.
यापुढं आम्ही दिव्यांगांसाठी शहीदांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. त्यामुळं मंत्रीपदाचा दावा सोडणार असल्याचा निर्णय मी घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे.