राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर फौजदारी खटला भरा :न्यायालय

औरंगाबाद (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचं मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात समजले आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल. शिवाय 6 वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Latest News