वॉचमनीच केली सोसायटीतील रहिवाश्यांना मारहाण…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनीच, सोसायटीच्या काही रहिवासांना अमानुष मारहाण केली आहे.लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, बाबू तसेच लाठ्या – काठ्यांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी सोसायटीमधील तिन रहिवाशांना बेदम मारहाण केली आहे.
प्राइड वर्ल्ड सिटीच्या मुख्य गेटवर एके फोर्टी सेवन सेक्युरिटी कंपनीचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मात्र त्या ठिकाणी मागिल काही दिवसापासून चैन सन्याचींग, मोबाईल सन्याचींग आणि महिलाना छेड काढण्याच्या घटना घडत आहेत
प्राइड वर्ल्ड सिटीच्या मेन गेटवरील पंधरा ते वीस सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीत मंगेश हवय्या मटपती याचं हात मोडल आहे. तर स्वप्निल तुकाराम देवकर याच्या डोक्याला 11 टाके लागले आहेत आणि चंद्रशेखर हनुमंत रोमन याच्या डोक्याला 8 टाके लागले आहेत
याविषयी प्राइड वर्ल्ड सिटीचे तीन रहिवासी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना मध्यरात्री मद्यप्राशन करून जाब विचारत होते. यादरम्यान सोसायटीतील सुरक्षारक्षकात आणि तीन रहिवाशात शिवीगाळ करून जोरदार बाचाबाची झाली. मात्र सुरक्षारक्षकांनी पोलिसांची मदत न घेता स्वतःच कायदा हातात घेऊन तीन रहिवाशांना अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणात मंगेश हवय्या मटपती यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस स्टेशनमध्ये प्राईड वर्ल्ड सिटीच्या पंधरा ते वीस सुरक्षारक्षकान विरोधात भादवि कलम 307, 326, 323 आणि इतर काही गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल केल्यानंतर दिघी पोलिसांनी प्राइड वर्ल्ड सिटीच्या काही सुरक्षारक्षकांना अटक देखील केली आहे. मात्र सुरक्षारक्षकांनी कुणाच्या इशाऱ्यावरून सोसायटीच्या रहिवाशांना मारहाण केली. याचा तपास होण गरजेचे आहे, अशी मागणी मारहाण झालेल्या सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.