पेगेसिस, राफेल, पंतप्रधान निधी या विषयांवर संसदेत प्रश्नच विचारायचे नाहीत का?- खासदार वंदना चव्हाण

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -गरीबी, बेरोजगारी सारखे प्रश्न का सुटत नाहीत, असा आमचा प्रश्न आहे.” मणिपूरमधील हिंसाचार थांबत नाही, महिला कुस्तीपटू न्यायासाठी लढत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोदी बोलत नाहीत. लोकांनी निवडून दिलेले सरकार फोडून नवे सरकार बनवले जात आहे. हे देशासाठी धोकादायक आहे,” अशा शब्दांत वंदना चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न व त्यांच्या पैशाबद्दल आम्हाला बोलू दिले जात नाही. सध्या केवळ एक टक्का भारतीयाकडे देशातील बहुतांश संपत्ती एकवटली आहे. ते देशाचे दरडोई आर्थिक उत्पन्न (जीडीपी) वाढत आहे, असे आम्हाला सांगितले जात आहे,

लोकशाहीची जननी असलेली भारतीय लोकशाही आता धोक्यात आहे. असे असूनही मुख्य प्रवाहातील माध्यमे काहीच बोलत नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. सरकार विरोधात बोलले की तुरुंगात पाठविले जाते. विरोधात बोलणारे विचारवंत, कलाकार, पत्रकार, राजकीय व्यक्ती यांना थेट तुरुंगात पाठविले जात आहे

. खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक यांना अटक करून दहशतवावाद्या सारखी वागणूक दिली, असे त्या म्हणाल्या.राजकारणात असूनही शांत आणि संयमाने बोलणाऱ्या जोरदार हल्लाबोल केला.

, राष्ट्रवादी काँग्रेसच्या  खासदार वंदना चव्हाण संसदेच्या अधिवेशना आधी केंद्र सरकारच्या अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  कारभारावरसंसदेत आम्ही महागाई, बेरोजगारी, हिंसाचार, आर्थिक विषमता अशा प्रश्नांवर बोलण्यासाठी अक्षरशः धडपडत असतो, महत्वाच्या प्रश्नांविषयी बोलण्यासाठी आम्ही नोटीस काढतो. तरीही आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही.

उल्हास पवार म्हणाले, “लोकशाहीसाठी आपण संघर्ष करत आहोत. सध्या सरंजामशाही सुरू असल्याची परिस्थिती आहे. आताची स्थिती ही भीतीदायक आहे. आता काही व्यक्तींचे उदात्तीकरण केले जात आहे. त्यामुळे खरे काय आहे याची अभ्यासपूर्ण मांडणी केली जात आहे. त्यामुळे त्यांचा आवाज बंद होत आहे.

लोकशाही दाबण्यासाठी प्रयत्न होत आहेत, त्याविरुद्ध सर्वांनी लोकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज आहे, तरच हे चित्र बदलू शकेल.” असा आरोप चव्हाण यांनी केला.आरोग्य सेनेच्यावतीने “मुल्याधिष्ठीत राजकारण आणि लोकशाहीचे काय? “या विषयावर पत्रकार भवन येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंदना चव्हाण (Vandana Chavan), माजी आमदार उल्हास पवार, आरोग्य सेनेचे प्रमुख अभिजित वैद्य उपस्थित होते.

या वेळी बोलताना चव्हाण म्हणाल्या, पेगेसिस, राफेल, पंतप्रधान निधी या विषयांवर संसदेत प्रश्नच विचारायचे नाहीत, अशी स्थिती आहे. सत्ताधाऱ्याकडून असे केले जात असेल, तर आम्ही दाद मागणार कुठे? या प्रकारामुळे आमचे मन अक्षरशः अस्वस्थ होत आहे, अशा शब्दांत संयमी चव्हण यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली

डॉ. बाबा आढाव म्हणाले, “हिंदू राष्ट्र करण्याचा त्याचा अजेंडा आहे. नितीमूल्ये पायदळी तुडवून साम, दाम, दंड, भेदाचा सर्रास वापर करीत नागरिकांवर दबाव आणून अप्रत्यक्षरित्या आणीबाणी लादली जात आहे. राजकीय सत्तेसाठी आघाड्या करून आता चालणार नाही. घटनेतील भारत निर्माण करायचा असेल तर आपल्याला आपली भूमिका रोखठोकपणे मांडली लागेल. त्यासाठी सध्या घडणाऱ्या घटना विरोधी प्रकराविरुद्ध आवाज उठविला पाहीजे. फक्त तुरुंगच भरले पाहिजेत, असे नाही तर सध्या घडणाऱ्या घटनांच्या विरोधात वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे रस्त्यावर उतरून उत्तर दिले पाहिजे

Latest News