शिंदे-फडणवीस सरकारला सामान्य जनतेचे काही पडलेले नाही- प्रकाश आंबेडकर  

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – अजित पवार देशाच्या राजकारणातील छोटेसे प्लेअर आहेत. सरकारला सामान्य जनतेचे काही पडलेले नाही. त्यांना आपली राजकीय पोळी भाजायची असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले., “राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवारांची चर्चा आहे. त्यांच्या गोंधळात शेतकरी सगळ्यात शेवटी गेला आहे. सरकारला सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही.”

VBA प्रकाश आंबेडकर हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एका वर्षात पुन्हा एकत्र येईल, असे भाकीतही वर्तवले.

“अजित पवारांना यंदा एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आपली राजकीय भूमिका कायम स्पष्टपणे मांडतात.

यापूर्वीही त्यांनी शरद पवार भाजपसोबत जातील अशी जाहीर वक्तव्ये केली आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील पडलेली फूट ही औटघटकेची ठरणार असल्याचेही भाकीत त्यांनी केले. तसेच देशाच्या राजकारणात उपमुख्यमंत्री छोटे ‘प्लेअर’ असून भाजपचा मोठा डाव असल्याचे आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले

आहेभाजपच्या राजकारणाला विरोधक बळी पडत असल्याची खंतही यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केली. देशाच्या राजकारणात अजित पवार लहान प्यादे असल्यचाही आंबेकरांनी स्पष्टपणे सांगितले आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले,

“कर्नाटकमध्ये लोकसभेला मोठा फटका बसणार असल्याची जाणीव भाजच्या वरिष्ठांना होती. ती कसर भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सूचना आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा जिंकण्याचे आदेश आहेत. यातूनच राज्यात विरोधकच ठेवायचा नाही ही भाजपची रणनीती असून फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे.

Latest News