‘इंडिया’ (INDIA) अर्थात ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स’ या नावावर लोकसभा लढवणार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी पहिल्या टप्प्यात विरोधकांनी जुन्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नाव खोडून ‘इंडिया’ (INDIA) अर्थात ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स’ या नावावर मोहोर उठवली आहे

. या नव्या प्रयोगातून आता मतदारांना भुरळ घालण्याचा विरोधी नेत्यांचा प्रयत्न असणार आहेभाजप विरोधकांच्या गटात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यासह इतर काही पक्षांनी नव्याने सहभाग घेतला आहे.  बैठकीत सुमारे २६ पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित लावली

या नव्या गटाचे नाव बदलण्याची चर्चा सुरू होती. या बैठकीत नवीन नावावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. यानुसार ‘यूपीए’ आता ‘इंडिया’ नावाने ओळखली जाणार आहे.

या गटात २६ पक्षांचा सहभाग आहे.लोकसभेच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र आलेल्या भाजपविरोधकांनी आपल्या व्यूहरचनेत बदलाला सुरूवात करून सज्ज होत आहेत.

बेंगळूरूत भाजपविरोधकांची दोन दिवसांची बैठक सोमवार (ता. १७)पासून सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आपल्या गटाचे नाव ठरवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्यास सर्व पक्षांनी अनुमोदन दिले.

तर आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ‘UNITED WE STAND…’ अशी विरोधी आघाडीची टॅगलाइन असेल. नव्या आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि संयोजक म्हणून नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा आहे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खर्गे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या रणनीतीवर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडीची रूपरेषा आणि सामायिक कार्यक्रमासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली

. तसेच काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधत बेंगळुरू येथील सभेचा उद्देश देश, लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा असल्याचे सांगितले.

Latest News