भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार- देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ठाकरे गटाच्या मागणीवर प्रतिक्रिया देतानायांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अंबादास दानवेंनी व्यक्त केलेला विषय गंभीर आहे. आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहे. आपल्याकडे काही तक्रारी असतील, त्या आमच्याकडे द्या. आम्ही त्याची चौकशी करू. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.
महिलेची ओळख सांगता येणार नाही.या प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी केली जाईल’.’किरीट सोमय्या यांना केंद्राची सुरक्षितता आहे. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे. ८ तासाचे व्हिडिओ मी सभापतींना देणार आहे.
ही व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे, असा गंभीर आरोप अंबादान दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला. अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार अनिल परब यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत सोमय्यांवर कारवाईची मागणी केली भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटले आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर विधीपरिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.’या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार. तसेच या प्रकरणातील पीडित महिलेची ओळख सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली दिली आहे. कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.
ठाकरे गटाच्या अनेक महिलांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला जात आहे. किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाचे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले आहेत