मी माझ्या चिन्हावर आमदार आहे. आमच्या हिंमतीवर उभे राहू. आता NDA सोबत नाही- महादेव जानकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – आम्हाला NDA च्या बैठकीला का बोलवलेलं नाही हे कारण तुम्ही नड्डांना विचारलं पाहिजे असं जानकर मीडियासमोर म्हणाले. आम्हाला घ्या घ्या असं आम्ही कशाला म्हणू? आम्ही कुणाकडे भिक मागायला जाणार नाही. आम्ही डिमांडर नाही कमांडर आहोत. आम्ही आमची स्वाभिमानाची झोपडी महाल कसा होईल यासाठी देशभर फिरणार आहोत. मी माझ्या चिन्हावर आमदार आहे. आमच्या हिंमतीवर उभे राहू. आता NDA सोबत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.महादेव जानकर यांनी याप्रकरणी उघड उघड मतं व्यक्त केली. गेल्या दोन लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं रासपला पाहिजे तसं वापरून घेतलं आणि आता मात्र त्यांना NDA च्या बैठकीचं आमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे जानकर चांगलेच वैतागले आहेत. आपण भाजपकडे भिक मागायला जाणार नाही, अशी भूमिका जानकरांनी वृत्तवाहिन्यांवर बोलून दाखवली आहे.आधी पाटणा आता बंगळुरू अशा विरोधी पक्षांच्या बैठकीतून भाजपच्या द्वेषपूर्ण राजकारणाला एक सक्षम पर्याय उभा करण्याचा प्रयत्न होत असलेला पाहून भाजपचं धाबं दणाणलं आहे. एकाधिकारशाहीने वागणाऱ्या भाजपला अचानक मित्र पक्षांची आठवण झाली असून घाईघाईत ‘NDA’ची बैठक बोलवण्यात आली आहे.38 पक्ष आपल्या सोबत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र त्यातही काही मित्र (?) पक्षांची नाव वगळ्यात आली आहेत. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) हे अशाच वगळ्यात आलेल्या नावांपैकी एक नाव आहे.

Latest News