अखेर पिंपरी-चिंचवड भाजप च्या शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाच सामना ) पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी कोणाची वणीं लागणार, याकडे संपूर्ण शहरा चे सर् लक्ष लागले होते. पोटनिवडणूक मध्ये महाविकास आघाडीला धूळ चारत भाजप न विजय खेचत आणला होता त्याचेच बक्षीस म्हणून भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केली आहे.भाजप शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली निवडूनक झाल्यापासून सुरु होती शहराध्यक्ष पदावर शंकर जगताप यांची निवडीची शक्यता वर्तविली होती. त्या दिवसापासून शहराध्यक्ष निवडीची चर्चा शहरात जोरात सुरु होती अखेर शिक्कामोर्तब होवून शंकर जगताप यांची भाजप शहराध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर झाली आहे.भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांना शहराध्यक्षपद देण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. भाजपची राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष १५ मे आणि नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या.शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्यांदाही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनाच शहराध्यक्ष होण्याचा आग्रह धरला होता. परंतु, त्यांनी विनम्रतापूर्वक नकार देत दुसऱ्या कोणाला तरी शहराध्यक्षपदी संधी देण्याची सूचना केली.दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराध्यक्षपद नाकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवली. त्यांचाही शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीमध्ये शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू होत्या पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते.परंतू, पक्षाने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती.

Latest News