संयुक्ता ‘ मधून घडले शक्तीस्वरूप स्त्रीचे भाव दर्शन !-भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

IMG-20230723-WA0006

‘ संयुक्ता ‘ मधून घडले शक्तीस्वरूप स्त्रीचे भाव दर्शन !—— कथा,कविता,नाट्यगीतांचे सादरीकरण—- भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ संयुक्ता’ या कथा,कविता,नाट्यगीत सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘अरुणिमा’ संस्थेने हा कार्यक्रम प्रस्तुत केला. निर्मिती,संहिता,लेखन अरुणा अनगळ यांची होती. ज्योती करंदीकर,मीनल परांजपे,शेफाली साकुरीकर सहभागी झाले. संकटावर मात करून स्वतःबरोबर इतरांचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या महिलांच्या कथा या कार्यक्रमात प्रभावीपणे मांडल्या गेल्या. सूत्रधार अरूणा अनगळ, कथा व नाट्य सादरीकरण मीनल परांजपे, ज्योती करंदीकर यांनी केले,

तर शेफाली कुलकर्णी साकुरकर यांनी कार्यक्रमातील कविता व गीतांचे सुमधुर गायन केले, या वेळी सिंथेसायझरवर तुषार दिक्षित यांनी साथ संगत केली.हा कार्यक्रम शनीवार,२२ जुलै २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला

.पूर्वी पासून आजवर समाजाकडून, पुरुषी वर्चस्वातून स्त्रीयांवर अनेकानेक अत्याचार झाले, अन्याय झाले, त्याला धीराने, धैर्याने सामोरे जाणाऱ्या विविध क्षेत्रातील स्त्रियांची चरित्रे, कथा, नाट्य प्रवेश, कविता, काल्पनिक मुलाखतींमधून कधी रंजक, कधी थरारक अनुभवांतून मांडल्या गेल्या.

उत्कंठावर्धक उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला!स्त्री ही स्वयंभू आहे, शक्तीरूप आहे तिला अबला नाही तर अभया म्हणायला हवे, असे मत संयुक्ता या कार्यक्रमाच्या सूत्रसधार यांनी गार्गी, द्रौपदी, जिजाबाई, कवयित्री बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, साधना आमटे आदी महिलांचे चरित्र उलगडून दाखवताना व्यक्त केले.

शेफाली साकुरीकर यांनी या वेळी नको देवराया अंत आता पाहू, मुडके ना देखो दिलबरो, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला अशी विविध महिला रुपे उलगडून दाखविण्याच्या वळणावर सुमधुर गीत गायनाने हा प्रवास आणखी रंजक केला

. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा १७३ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले

Latest News