अग्निवीरच्या धरतीवरच्या राज्यस्तरीय कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पोलीस भरतीचा निर्णय मागे घ्या :सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

अग्निवीरच्या धरतीवरच्या राज्यस्तरीय कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पोलीस भरतीचा निर्णय मागे घ्या :सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाच सामना ) महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरावर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्रातील हजारो कठोर परिश्रम घेऊन तयारी करून पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजार युवक युवतींच्या स्वप्नाचा चुराडा करणार आहे. त्यामुळे आपल्या या निर्णयाचा मी तीव्र शब्दात निषेध करत आहोत. तात्काळ निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे

खरे तर पोलीस खाते राज्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विभाग असून त्यामध्ये अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पोलीस भरती झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टाकले जातील. याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील निरअपराध १३ कोटी नागरिकांना भोगावे लागणार आहे.

आपण महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत आहात.त्यामुळे हा निर्णय आपल्या आजूबाजूच्या बगलबच्चे ठेकेदारांचा पोट भरण्यासाठी घेतलेला निर्णय असून हा समाजविघातक निर्णय तातडीने आपण मागे घ्यावा. अन्यथा या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलनाचा आगढोंब उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण युवक व युवतींच्या भविष्याशी न खेळता हा आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा. अशी मागणी निवेदनातून केली मारुती भापकर यांनी केली आहे

Latest News