भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये बीबीए,बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात प्रारंभ


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट( आयएमईडी) मध्ये बीबीए,बीसीए अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्राम ला चांगला प्रतिसाद मिळाला. दि. २४ जुलै रोजी प्रारंभ झाला आणि ३१ जुलै पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या नव्या तुकडीच्या पायाभरणीसाठी शैक्षणिक,कारकिर्दविषयक समुपदेशन आणि क्रीडा विषयक सत्रांचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उपप्राचार्य डॉ रामचंद्र महाडिक,डॉ स्वाती देसाई,डॉ सुचेता कांची यांनी आयोजन केले. पुणे मेट्रो ला भेट देण्यात आली तसेच वेताळ टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले.
युन क्यून्ग की (दक्षिण कोरिया),डॉ सोनिया बिलोर(स्वीडन),पूजा भाले,डॉ.योगेश पवार,अनिरुद्ध सूर्यवंशी,रेशु अगरवाल,डॉ विणू,प्रिया चौधरी,नेहा भाटे यांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली.
डॉ.हेमा मिर्जी, दीपक नवलगुंद, डॉ नेताजी जाधव,श्रेयस डिंगणकर ,डॉ सोनिया सोरटे ,डॉ भारती येळीकर ,डॉ विजय फाळके ,स्वप्नील थोरात ,प्रतिमा गुंड ,डॉ सुजाता मुलिक,डॉ वृषाली शितोळे,संगीता पाटील, अरुण पवार यांच्यासह व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ.सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच कारकिर्दीच्या संधींची माहिती दिली .ते म्हणाले , ‘आयएमईडी च्या प्लेसमेंट ड्राइव्हला कंपन्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे . विद्यार्थ्यांना आधुनिक जगातील अद्ययावत ज्ञान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील नवी क्षितिजे गाठण्यासाठी मार्गदर्शन घेऊन यशस्वी व्हावे ‘, भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्याचे एसडब्ल्यूओसी अनॅलिसिस( SWOC analysis ) केले गेले