PCMC: पिंपरी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पिंपरी चिंचवड महापालिकेचेकोट्यवधी रुपयांचे आणि राज्य सरकारचेही मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी लाखो रुपयांचे नुकसान त्यामुळे झाले आहे, असा दावाही त्यांनी केला होता. गेल्या वर्षी केलेल्या या मेलची दखल सहा महिन्यानंतर नगरविकास विभागाकडून घेण्यात आली. नगरविकास विभागाने यासंदर्भात आपला अहवाल देण्यास पिंपरी पालिका आयुक्तांना सांगितले आहेकरसंकलन विभागातील गैरव्यवहाराच्या पुराव्यासह १९ तक्रारी शहरांतील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या. मात्र, त्याची त्यांनी दखल न घेतल्याने नगरविकासमंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडेच ही तक्रार वाघेरे यांनी केली होती. त्यामुळे करसंकलन विभाग आणि त्यांचे सहायक आयुक्त यांना पालिकेचे आयुक्त हे पाठिशी घालत गैरव्यवहार आणि नियमबाह्य कामकाजाला मूकसमंती देत आहेत का, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराची वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालिकेतील भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नगरविकासमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी केली होती. नगरविकास विभागाने त्याची सहा महिन्यांनी दखल घेत पिंपरी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.करसंकलन विभागात अनागोंदी कारभार सुरू असून प्रचंड गैरव्यवहारहोत असल्याची तक्रार वाघेरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या गैरव्यवहरामध्ये मिळकतकर विभागातील शिपायापासून सहायक आयुक्तांपर्यंत साखळी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता

Latest News