पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरात दौरा कसा असेल….

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १) सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १२.४५ मिनिटांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

मेट्रो १ च्या दोन मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात असणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत काही बदल केले आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी येणार असल्यामुळे पीएमपीच्या काही मार्गामध्ये बदल केला जाणार आहे.

१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आणि आण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. ३५४ या मार्गांच्या बस जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी जाणार आहे. त्याऐवजी ही वाहतूक लक्ष्मी नारायण टॉकीजकडून सारसबाग मार्गे होणार आहे.

तसेच स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद होणार असल्यामुळे बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात येणार आहेत. पुणे दौऱ्यात त्यांची विविध कार्येक्रमही नियोजित करण्यात आली आहेत. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणे, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचाही समावेश आहे.पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने सिंहगड रस्त्यावर सुरु करण्यात येणारी कामे थांबवण्यात आली आहेत. या रस्त्यावर नो पार्कींग नो हॉल्टिंगचे काम सुरु केले जाणार होते. आता हे काम पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानंतर करण्यात येणार आहे.

मोदींचा पुणे दौरा कसा असेल त्या बद्दल जाणून घ्या…
– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार.
– पुण्यातील मेट्रोसह विविध प्रकल्पांच मोदी करणार उद्घाटन
– कसा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा
– पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर येत आहेत.
– 10.30 वाजता पंतप्रधान मोदींच पुणे विमानतळावर आगमन होईल
– सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत.
– 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
– त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत
– शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर मोदींची सभा होईल
– तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
– पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत.

1 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात येणार
– पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची माहिती
– 1 ऑगस्टला सकाळी 6 वा. ते दुपारी 3 दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील.
– पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.
– वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Latest News