लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण

May be an image of 9 people and temple

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भिमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते.

यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली.

जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Latest News