पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो गरजेची आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राज्याने भाजपला खूप प्रेम दिले आहे. अशीर्वाद दिला आहे. तो अशीर्वाद कायम राहिल अशी अशा व्यक्त करत मोदींनी राज्यातून लोकसभेला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. “महाराष्ट्राचा विकास होईल, तेव्हाच भारताचा देश विकास होईल. भारताच्या विकासातून महाराष्ट्राच्या वाट्याला सारे काही येणार आहे”,असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडल्याचे मानले जात आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचेही लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत मोदी म्हणाले, “पूर्वी महिलांना घरातीलच कामे करावी लागत होती. त्यांच्या नावे कुठल्याही प्रकारची संपत्ती नसायची. आता लाखो रुपये किंमत असलेली घरे महिलांच्या नावावर करण्यात येत आहेत. यातून देशातील महिला, दिदी खऱ्या अर्थाने लखपती झाल्या आहेत. परिणामी त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी लोकमान्य टिळक पुरस्कार प्रधान करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोसह इतर प्रकल्पांचे उदघाटन केले. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचे महत्त्व सांगून मोदींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारलेल्या योजना मांडत पुढील निवडणुकीसाठी पुणेकरांना मोदींनी साद घातली. पुणे शहरात तरुणांना साामवून घेत, त्यांना रोजगार देण्याची क्षमता आहे. त्यामुळेच पुण्यासारख्या शहरातील लोकांचे जीवनमान उंचावत असल्याकडे लक्ष वेधून मोदींनी पुणेकरांना आपलेसे करण्याचाही प्रयत्न केलापुण्यातही चांगल्या सुविधा देऊन लोकांना बदलेल्या विश्वात नेले आहे. पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो गरजेची आहे. त्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करीत आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. याआधी पाच देशांत मेट्रो होती. आजघडीला २० देशांत ही सेवा आहे. दिल्लीत आठशे किलोमीटर लांबीची मेट्रो आहे