महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याकरिता आम्ही सगळे एकत्र -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – pcmc/ पुण्यातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे आणि पिंपरी महापालिकेच्या कचऱ्यापासून वीज तयार करणाऱ्या प्रकल्पाचे उदघाटन,पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे वाटप आणि या योजनेतील नव्या प्रकल्पाचे भुमिपूजन यावेळी मोदींनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यावेळी व्यासपीठावर होते

महिन्यापूर्वी राज्यात दुसरा राजकीय भूंकप झाला बंड करून अजित पवार गटाने शिंदे-फडणवीसांच्या सरकारला पाठिंबा दिला. ते त्यात सामील झाले. त्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते (शरद पवार,अजित पवार) हे प्रथमच एका व्यासपीठावर आज आले.

बंड आणि उपमुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेतल्यानंतर अजितदादाही प्रथमच पुण्यात आले होते. त्यामुळे कोण काय बोलणार, याकडे लक्ष लागले होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी ‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला

. त्यानंतर शिवाजीनगर येथील मैदानात पिंपरी-चिंचवड,पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि मेट्रोच्या प्रकल्पांची उदघाटने आणि भुमिपूजने केली. ‘हित जनतेचे, उभारणी भविष्याची’ असे घोषवाक्य असलेल्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केलीराज्यातील नव्या राजकीय समीकरण तथा एकत्रीकरणाचे फडणवीस यांनी यावेळी आपल्या भाषणात जोरदार समर्थन केले

.ते करताना त्यांनी मिश्कील टिपण्णी तथा शेरेबाजीही केली.आजच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्याला ते आणि मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित होते, हा धागा पकडीत मेट्रोच्या पहिल्या टप्याच्य़ा उद्घाटनालाही आम्ही तिघे हजर होतो.

पण त्यावेळी वेगळ्या भुमिकेत होतो. वेगळा रोल निभावत होतो. मी विरोधी पक्षनेता,उपमुख्यमंत्री ,तर नगरविकासमंत्री शिंदे होते. आज मी व दादा दोघेही उपमुख्यमंत्री,तर शिंदे मुख्यमंत्री आहोत. पुण्याच्या स्वप्नांना गती देण्य़ासाठी व महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याकरिता आम्ही (शिंदे,फडणवीस,पवार)सगळे एकत्र आलो आहोत,असे ते म्हणताच त्याला मोठी दाद उपस्थितांची मिळाली.

देशातले उत्तम शहर पुण्याला मोदींच्या नेतृत्वात सर्वोत्तम करून दाखवू, असा विश्वास त्यांनी पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहेतूकपणे व्यक्त केला.आपला हा हेतू पुढे रेटताना त्यांनी देशातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक बसचा ताफा हा पुणे महापालिकेला दिल्याचे आवर्जून सांगितले

Latest News