PUNE कोरेगाव भीमा: गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने अट आणि शर्तींच्या आधारे जामीन मंजूर….

pune: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

कोरेगाव भीमा येथे लढाईच्या स्मरणार्थ एक जानेवारी रोजी अभिवादनाचा कार्यक्रम असतो. त्याच्या अगोदर पुण्यात एल्गार परिषद झाली होती, त्यात प्रक्षोभक भाषणे केल्यामुळे कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाल्याचा ठपका या व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांच्यासह नऊ जणांवर ठेवण्यात आला होता. त्याप्रकारणात गोन्साल्वीस आणि फरेरा गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. मात्र, जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यात गोन्साल्वीस आणि फरेरा यांनी आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा. आपला पत्ता आणि मोबाईल नंबर एनआयएला देण्यात यावा. आरोपींनी एकच मोबाईल वापरावा. तसेच, आठवड्यातून एकदा तपास अधिकाऱ्यांसमोर आरोपींनी हजेरी लावावी आदी अटी व शर्तींचा समावेश आहे. व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा हे २०१८ पासून कारागृहात होते. या आरोपींची आज तळोजा जेलमधून सुटका होणार आहे कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणी व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने अट आणि शर्तींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. तो जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा यांची मुंबईच्या तळोजा जेलमधून तब्बल पाच वर्षांनंतर सुटका होणार आहेकोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणीव्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा हे २०१८ पासून कारागृहात होते. मुंबई उच्च न्यायालयानेत्यांचा जामीन नाकारल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातधाव घेतली हेाती. गोन्साल्वीस आणि फरेरा यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, पण त्या एकमेव कारणामुळे त्यांना जामीन नाकारता येणार नाही. ते गेल्या पाच वर्षांपासून कारागृहात आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन देताना म्हटले होते

Latest News