ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी फायनलान्स कंपनीच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – त्यावेळी कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकला गेला असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटलं. नितीन देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्येही Edelweiss कंपनीच्या लोकांची नावे घेतली आहे. पाच जणांमध्ये रशेष शहा, केयूर मेहता, स्मित शहा, आरके बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांचे नावे आहेत.नितीन देसाईंचं ‘ते’ स्वप्न अखेर राहिलं अपूर्णच; जवळच्या मित्राशी काही दिवसांपूर्वीच केली होती चर्चानितीन देसाई यांनी फायनान्स कंपनी ECL कडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी पाच जणांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले.ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलीसांनी फायनलान्स कंपनीच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केली.या प्रकरणातील एफआयआर कॉपी समोर आली असून नेहा देसाई यांनी तक्रारीत आपले पती नितीन देसाई यांना फायनान्स कंपनीकडून स्टुडिओच्या कर्जासंदर्भात मानसिक त्रास दिला गेल्याचं आणि दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. तसंच कोणतीही माहिती न देता या कंपनीने कर्ज दुसऱ्या फायनान्स कंपनीकडे वर्ग केल्याचंही म्हटलं आहे.नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. हाच स्टुडिओ हडपण्यासाठी Edelweiss फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेगवेगळी आश्वासने दिली. मोठं कर्ज दिलं, पण कोरोना काळात सगळा व्यवसाय ठप्प होता.रशेष शहा यांचे नावही ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा आरोप नितीन देसाई यांच्या पत्नीने केला आहे. फायनान्स कंपनीनकडून स्टुडिओ हडपण्यासाठी प्रयत्न केले गेले. स्टुडिओमध्ये गुंतवणुकीसाठी काही जण तयार होते पण त्यासाठी सहकार्य केले गेले नाही. माझ्यावर कर्जाचा बोजा टाकून प्रेशराइज केले गेले असं नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.फायनान्स कंपनीला आमच्या स्टुडिओत गुंतवणूकदार येऊ द्यायचे नव्हते.
आमची मालमत्ता बळकावायची होती असं हेतू दिसत होता. त्यामुळेच माझे पती मानसिक दडपणाखाली होते. मी त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला होता असंही नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसंच न्यायालयाने प्रशासक म्हणून नेमलेल्या जितेंद्र कोठारी यांचाही फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरून स्टुडिओ ताब्या घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन देसाईंच्या पत्नीने केला आहे.
पाचही जणांनी कर्जाच्या वसुलीसाठी नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिल्याचा आणि या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असं नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटलंय.दरम्यान, नितीन देसाई यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर फायनान्स कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही जे काही केलं ते सर्व कायद्यानुसार केल आहे. आरबीआयच्या नियमानुसार केले असून कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. नितीन देसाई यांच्या मृत्यूचे आम्हालाही खूप दु:ख आहे असं कंपनीने निवेदनात म्हटलंय.