गडचिरोली सारख्या नक्षलवादी दुर्गम भागात काम करणाऱ्या काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पद दिले – आमदार रवींद्र धंगेकर

पुणे- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

विजयी वडेट्टीवार यासारख्या काँग्रेसच्या दुसऱ्या फळीच्या नेत्याला विरोधी पक्षाच्या नेते पदाची जबाबदारी देऊन काँग्रेस पक्षाने एक नवीन पायंडा पाडला आहे गडचिरोली सारख्या नक्षलवादी दुर्गम भागात काम करणाऱ्या काँग्रेसने त्या कार्यकर्त्याला विरोधी पक्ष नेते पदाची धुरा देऊन पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी पक्षाचे मनापासून अभिनंदन करतो

राज्यातील गोरगरीब कष्टकरी व वंचित समाजाला नागरिकांना नक्की न्याय मिळेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो,आप्पा जाधव दीपक जगताप विजय वर भवन निलेश धुमाळ विठ्ठल थोरात राजू शेख गौरव बालिंदे परवेझ तांबोळी फयाज शेख जयकुमार ठोंबरे रोहन सुरवसे अविनाश अडसूळ मंगेश निरगुडकर साहिल राऊत, योगेश आंदे, सूर्यकांत मारणे, प्रसाद गावडे व माहाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की मी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्यावर माझा पहिला सत्कार पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात होत आहे छत्रपती शिवरायांच्या बालपण लाल महालात गेले आई जिजाऊंचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी जबाबदारी मला सोपवली आहे ती मी यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम करणार आहे

राहुल गांधी यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आणून त्यांना गप्प करण्याचा कट भारतीय जनता पक्षाने रचला होता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली भारत जोडो यात्रेच्या मार्फत राहुल गांधींनी देशातील सर्व जाती जमातीला एकत्र करून देशाची एकता आणि अखंडता टिकवण्याचे प्रयत्न करत आहे

त्यांच्या भारत जोडो यात्रेला देशाच्या जनतेने चांगला प्रतिसाद दिला अन्यायाविरुद्ध लढणे ही काँग्रेसची परंपरा आहे आणि ही परंपरा घेऊन मी राज्याच्या जनतेच्या हितासाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव कार्य करत राहणार आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांचा सत्कार करण्यात येत आहे

कार्यक्षम आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून विजय वडेट्टीवार यांचा सत्कार होत आहे ही फार अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या आक्रमक काम करण्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी सोपवली आहे मला खात्री आहे तेही जबाबदारी योग्यरीत्या व यशस्वीरित्या पार पाडतील

पुणे-कसबा मतदार संघ (महाविकास आघाडीच्या वतीने) वतीने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा कार्यक्षम आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वतीने भव्य नागरीक सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,ज्येष्ठ नेते उल्हास पवार,विशाल धनवडे,अविनाश बागवे,संजय बालगुडे,वीरेंद्र किराड, गजानन थरकुडेपल्लवी जावळे, नुरुद्दीन सोमजी,प्रवीण करपे गणेश नलावडे, चेतन अग्रवाल सुरेश कांबळे गौरव बोराडे, रमेश अय्यर निकिता मारटकर, रुपेश पवार, हे मान्यवर उपस्थित होते

Latest News