गरीब रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे हीच खरी सेवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते,
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,” दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण हे जनसमान्यांच्या प्रति संवदेना असलेले, समाजाची स्पंदने ज्याला समजतात असे सामाजिक नेतृत्व होते.
आपल्या जीवनात पद मिळण्याचा आनंद क्षणिक असतो, मात्र उपचाराने बरे झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो आणि आरोग्य सेवा देणे आणि गरीब रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा आहे अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली
त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम करताना त्यांचा वारसा आणि वसा त्यांच्या कुटुंबियांनी पुढे सुरू ठेवला. त्यामुळे ६० हजार रुग्णांना आज लाभ झाला आहेकार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, माजी मंत्री सुरेश नवले,अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले, प्रास्ताविक वैद्यकीय कक्ष अधिकारी रामेश्वर नाईक यांनी केले तर आभार आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले यांनी मानलेमहाआरोग्य शिबिराचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलताना म्हणाले,” राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २ हजार ४१८ संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दिवंगत विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली.