जेजुरीसाठी सरकारने ३५९ कोटींचा निधी मंजूर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – शासन आपल्या दारी’ हा उपक्रम ऐतिहासिक आहे. सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी आम्ही गेली वर्षभर काम करत आहोत. दीड कोटी लाभार्थ्यांनी आतापर्यंत या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी पहिल्या कॅबिनेट बैठकीपासून शेतकरीहिताचे निर्णय घेत आहोत. आम्ही ३५ सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे,

त्यातून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहेजेजुरीसाठी राज्य सरकारने ३५९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील १०९ कोटींच्या कामांचे आज (ता. ७ ऑगस्ट) भूमिपूजन करण्यात आले आहे

. त्यातून खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळतील. राज्यातील ७ ते ८ कोटी लोकांना ‘शासन आपल्यादारी’तून लाभ मिळेल, अशी घोषणाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेजेजुरीत आज (ता. ७ ऑगस्ट) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला

. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंबोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आमदार उपस्थित होते

राज्यकर्त्यांच्या हिताचा एकही निर्णय आम्ही गेल्या वर्षभरापासून घेतलेला नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवारआमच्यासोबत आले आहेत. राज्याच्या विकासाच्या मुद्यावर ते आमच्याबरोबर आले आणि डब्बल इंजिनचे सरकार आता ट्रीपल इंजिन झाले आहे,

त्यामुळे हे सरकार आता बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करेल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अधिकारी गावागावांत जाऊन काम करीत आहेत.

सरकारी निर्णयाची अंमलबजावणी अधिकारीच करतात. देवेंद्र फडणवीस सरकार असताना राज्य पहिल्या क्रमांकावर होतं. मधल्या काळात ते खाली गेलं होतं. पण आता पुन्हा परदेशी गुंतवणुकीत आपण पहिल्या क्रमांकावर आलो आहोत‘

शासन आपल्या दारी’ या उपक्रमावर टीका करणाऱ्यांना उघडा डोळे बघा नीट असे मी आवाहन करतो. पोटदुःखी होणाऱ्यांसाठीही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. त्यांच्यावरही मोफत उपचार केले जातील. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत

. महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचे पाठबळ आपल्याला मिळत आहे. ज्येष्ठासाठी मोफत एसटी प्रवास, महिलांना पन्नास टक्के सवलत असे अनेक निर्णय घेतले आहेत. प्रत्येक कॅबिनेटमध्ये लोकहिताचे निर्णय घेतल्याचे आपल्याला दिसून येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

Latest News