पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश  देशपांडे यांना दिलेलेली पदोन्नती बेकायदेशीर मुंबई  उच्च न्यायालय

FB_IMG_1691737538168

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश  देशपांडे यांना दिलेलेली पदोन्नती बेकायदेशीर मुंबई  उच्च न्यायालय!

= डिझेल घोटाळ्यातील मुख्य आरोपीला  पदोन्नती दिल्याने हायकोर्टाची नाराजी “””

=नव्याने DPC बैठक  घेऊन  बाबासाहेब कांबळे यांना पदोन्नती देण्याचे कोर्टाचे आदेश

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाच सामना : विनय लोंढे ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश शंकर देशपांडे यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर ठरवून  नव्याने DPC बैठक घेऊन  सिनियर असलेल्या आरोग्य अधिकारी  बाबासाहेब कांबळे यांना तात्काळ पदोन्नती देण्याचे आदेश  20 जुलै 2023 ला मुंबई उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती संदीप मारणे, धीरज सिंग ठाकूर यांच्चा खंड पिठाने  महापालिका  प्रशासनाला दिले आहेत

आज महापापालिकेत dpc बैठक होणार आहे त्या मध्ये मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी म्हणून बाबासाहेब कांबळे यांची निवड होणार असल्याचे खात्रीलायक समजते त्यामुळं झालेली प्रशासनाची चूक दुरुस्त होईल असं मानायला हरकत नाही मात्र चुकीचा निर्णय घेणाऱ्या DPC सदस्य याच्यावर कोणती कारवाई करणार हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे पिंपरी महापलिका प्रशासनाने 18 महिन्या पूर्वी गणेश देशपांडे  यांना बेकायदेशीरपणे  सर्व नियम डावलून पदोन्नती दिले होती. ती मुंबई हायकोर्टाने रद्द केली आहे

. महापालिका सामान्य प्रशासन विभागाला मोठी चपराक बसली आहे. महापालिका पदोन्नती समितीने पुन्हा बैठक घेवून आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर गुणवत्तेनुसार फेरनिवड करावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डिझेल चोरीचा गुन्हा उघड झालेले आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश शंकर देशपांडे यांनी चुकीच्या पद्धतीने पदोन्नती घेतली असल्याने त्यांच्यावर आज होणाऱ्या पिंपरी महापालिकेच्या ( DPC) बैठकीत कारवाई होणार असून त्यांच्याजागी बी बी कांबळे यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.महानगरपालिकेचे क क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे यांना आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला होता.

मात्र, त्यांचा पदभार काढून घेत कांबळे यांची सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हता डावलून प्रशासन विभागाने पदोन्नती समितीच्या शिफारसीनूसार तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे र, वैद्यकीय अधिकारी अनिल रॊय यांनी नियमबाह्यपणे आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर गणेश शंकर देशपांडे यांना 12 नोव्हेंबर 2021 मध्ये पदोन्नती दिली होती.

याबाबत सदरील दिलेल्या पदोन्नतीवर आक्षेप घेत सहायक आरोग्याधिकारी बी.बी. कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती.

2008 मध्ये ड प्रभाग मध्ये आरोग्य निरीक्षक गणेश देशपांडे असताना डिझेल घोटाळा 64 लाख रुपयाच झाला होता त्या चौकशी मध्ये देशपांडे हे दोषी आढळून आले होते त्या मध्ये त्याच्याकडून 14 लाखाची वसूली करण्यात आली होती. तसेच त्याच्या दोन वेतन वाढ रोखण्यात आल्या होत्या तरी पण महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या देशपांडे यांना प्रशासनाने आर्थिक हित समाधा खातर महापालिकेने पदोन्नतीमधील दिले होते.

आरक्षण रद्द करण्यासंर्दभात सर्वाच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 28306/2017 मध्ये होणार अंतिम निर्णय, शासन निर्णय दि. 7 मे 2021 चे अधिन आणि सदरील पदोन्नतीसाठी उच्च न्यायालय, मुंबई येथील प्रलंबित असलेले रिट पिटीशन (स्टॅम्प) क्रमांक 10876/2021, रिट पिटीशन क्रमांक (स्टॅम्प) क्रमांक 10878/2021, तसेच रिट पिटीशन क्रमांक 10909 मध्ये होणा-या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून गणेश शंकर देशपांडे (सहायक आरोग्याधिकारी) यांना आरोग्य कार्यकारी अधिकारी अभिनामाचे पदावर ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यास प्रस्तुतच्या आदेशान्वये तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी म्हणून गणेश शंकर देशपांडे यांना दिलेली पदोन्नती मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत रद्द केली आहे. तरी पण 20 जुलै ला आदेश येऊन पण प्रशासनाने त्याचे पद काढून घेतले नाही.

त्याबाबत पण हायकोर्टाने प्रशासनाच्या dPC सदस्य याच्यावर ताशेरे ओढले आहेतमहापालिकेने आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी डीपी समितीची तातडीने बैठक घ्यावी. गुणवत्तेवर सेवा ज्येष्ठतेनुसार आणि शैक्षणिक अर्हता तपासून निवड करावी, निवड झालेल्या संबंधितास 12 नोव्हेंबर 2021 रोजी पासून आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाची पदोन्नती ग्राह्य धरण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहेत.

महापालिकेचे सहायक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे यांना आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर दिलेली पदोन्नती मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत रद्द केल्याने महापालिका आयुक्तासह सामान्य प्रशासन विभागाला चपराक बसली आहे. देशपांडे यांना पदोन्नती देताना महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2020 मधील नियम 6 ही अट शिथील करण्यात आली.

आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती देताना शासनाची पुर्व मान्यता न घेता सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नती दिलेली आहे. त्यामुळे गणेश देशपांडे यांना आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावरुन पुन्हा सहायक आरोग्याधिकारी पदावर पदावतन करावे लागणार आहे

.महानगरपालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी पदावर दिलेली पदोन्नती मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. त्या पदावर पदोन्नती देण्यासाठी डीपी समितीची पुन्हा बैठक घेवून सेवाज्येष्ठता, गुणवत्ता आणि शैक्षणिक अर्हता तपासून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिलेले आहेत. यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल.असे विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महानगरपालिका पिंपरी-चिंचवड सांगितलं आहे

Latest News