करियरमध्ये ध्येयपूर्तीसाठी झटत रहा ! :सचिन कालगुडे — डी .वाय.पाटील युनिव्हर्सिटीमध्ये ‘आरंभ’ मधून मार्गदर्शन

IMG-20230811-WA0012

करियरमध्ये ध्येयपूर्तीसाठी झटत रहा ! :सचिन कालगुडे — डी .वाय.पाटील युनिव्हर्सिटीमध्ये ‘आरंभ’ मधून मार्गदर्शन —१८ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे

पुणे : डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी (आंबी,पुणे) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आरंभ ‘या फ्रेशमन ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या दुसऱ्या दिवशी १० ऑगस्ट रोजी अक्सेंचर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कालगुडे,नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे प्राचार्य डॉ.ओ.पी.शुक्ला,अँटी नार्कोटिक्स विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक महाले,मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या प्रा.ज्योती जैन यांनी मार्गदर्शन केले.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ.सायली गणकर यांनी प्रास्ताविक केले

.डॉ रोहन दास यांनी स्वागत केले.डॉ.अझीम शेख,डॉ. प्रणव चरखा यांनी आभार मानले. ‘करियरमध्ये ध्येयपूर्तीसाठी झटत रहा.समस्या आणि प्रश्नांचे भाग बनण्याऐवजी उत्तरांचे भाग बना.त्यासाठी स्वतःचे आत्मपरीक्षण करा,निवडलेल्या मार्गावर ठाम रहा आणि कृती योजनेवर कार्यरत रहा’,असे प्रतिपादन सचिन कालगुडे यांनी केले

.डॉ.शुक्ला यांनी अध्ययन,शिस्त आणि समस्यांच्या समाधानाचे मार्ग सांगितले.सहायक पोलीस निरीक्षक महाले यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.डॉ ज्योती जैन यांनी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा,याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान,९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘आरंभ’ या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. ‘

बार्कलेज’चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वुक्कलम,अदानी इलेक्ट्रिसिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध खेकाळे,’लुपिन लिमिटेड’ चे उपाध्यक्ष रितुराज सार,कर्नल सुनील भोसले,प्रा.कारंडे यांच्या उपस्थितीत झाले.१८ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

अभियांत्रिकी ,व्यवस्थापनशास्त्र,आर्किटेक्चर,फार्मसी, लॉ,डिझाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत या कार्यक्रमातून करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीची पायाभरणी होण्यासाठी आणि वैयक्तिक विकासाची,व्यक्तिमत्व विकासाची योग्य सुरुवात म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते.

या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व,रोल मॉडेल त्यांच्यासमोर यावीत,यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. .दररोज १० ते ४ या वेळात ओरिएंटेशन प्रोग्राम पार पडणार आहे

Latest News