‘भाग्ये देखिला तुका’ नृत्य नाट्याने जिंकली मने! भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः ऑनलाईन परिवर्तचा सामना –

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘भाग्ये देखिला तुका’ या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील नृत्य नाट्य कार्यक्रमाने शनिवारी रसिकांची मने जिंकली !

हा कार्यक्रम शनीवार,१२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.

या नृत्य नाट्याची निर्मिती ‘कलापिनी’ (तळेगाव दाभाडे) यांची असून ‘सृजन नृत्यालय’ (तळेगाव दाभाडे) यांनी प्रस्तुत केले. लेखन, दिग्दर्शन व नृत्य रचना डाॕ. सौ. मीनल कुलकर्णी यांची होती.संगीत दिग्दर्शन सौ. संपदा थिटे यांचे होते.मिहीर देशपांडे ,मीनल कुलकर्णी ,विराज सवाई,प्रसन्न कुलकर्णी डाॕ. विनया केसकर हे कलाकार आणि संजीव मेहेंदळे व संपदा थिटे हे गायक सहभागी झाले.

हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७६ वा कार्यक्रम होता.

नृत्य नाट्याला भरभरून प्रतिसाद

भागवत धर्माचा कळस म्हणजे तुकाराम महाराज .जीवनाचे व्यावहारिक तत्वज्ञान कळकळीने मांडणारे लोक शिक्षक तुकाराम महाराज . अशा तुकाराम महाराजांची शिकवण आजच्या काळातही तितकीच मोलाची आहे. ती शिकवण व त्यांनी दाखवलेला मार्ग अनेकांपर्यंत विशेषतः नवीन पिढी पर्यंत पोहचवावा या उद्देशाने भाग्ये देखिला तुका या नृत्य नाट्याची निर्मिती केली गेली आहे. पवित्र इंद्रायणी नदी ही आपल्याला तुकाराम महाराजांच्या जीवनातले प्रसंग सांगते व त्यांचे अभंग नृत्य रुपात सादर करते अशी या नृत्य नाट्याची संकल्पना होती. गाथा प्रसंग , छत्रपती शिवाजी महाराज वा तुकोबांची भेट असे महत्त्वाचे प्रसंग यात सादर केले गेले . तुकाराम महाराजांच्या अभंगातले विचार विविध आकृतीबंधा तून यात दाखवले गेले . रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Latest News