पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 15 भाजपकडे जागा मागणार – रामदास आठवले

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 12 ते 15 जागाची मागणी भाजपा कडे करणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं

तक्रारी आल्यामुळे बरखास्त केलेली पिंपरी-चिंचवड पक्षाची शहर कार्यकारिणी आणि अध्यक्षांच्या जागी नव्या नियुक्त्या महिन्याभरात केल्या जातील, असे यावेळी पक्षाच्या प्रदेश महिलाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी सांगितले

मणिपूर हिंसाचारावर केंद्रातील सत्ताधारी भाजपची चर्चेची तयारी होती. पण, विरोधकांच्या गोंधळामुळे ती होऊ शकली नाही, असा आरोप आठवले यांनी यावेळी केला. लोकसभेला ‘एनडी’ए सोबत असल्याने त्यांना महाराष्ट्रात चाळीसपेक्षा अधिक जागा मिळतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली

. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलले जाणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या अनेक स्मारकांची भुमीपूजने झाली, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षबांधणीसाठी विभागवार पक्षाची शिबिरे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली

. आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर वारभूवन, वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अझिज शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

न्यायालयीन कचाट्यात सापडलेली महापालिका निवडणूक या वर्षअखेरीस होण्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रात दोन जागांची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर, 

आरपीआय’ चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीहे शनिवारी पुणे व पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यात दुपारी दोन वाजता पिंपरी-चिंचवडमध्ये ठेवलेल्या पत्रकारपरिषदेला ते दोन तास उशीरा सायंकाळी चार वाजता आले. पाच वाजताच्या पुण्यातील कार्यक्रमाला जायचे असल्याने फक्त तीन प्रश्नांना उत्तरे देत आठ मिनिटांत त्यांनी पत्रकारपरिषद आटोपती घेतली.

Latest News