डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस पदी नियुक्ती


पुणे :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)च्या पुणे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी डॉ.मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर ,पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, आमदार सुनील टिंगरे, अप्पा रेणुसे उपस्थित होते.कट्टर अजित पवार समर्थक म्हणुन त्या ओळखल्या जातात.
डॉ.मोरे यांनी पुणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून काम केले आहे. रोटरी,पर्वती नागरी कृती समिती,भगिनी हेल्पलाईन,सुखकर्ता प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे.त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय चिकित्सक सन्मान,माऊली कृतज्ञता गौरव,पर्वती भूषण,बिबवेवाडी भूषण पुरस्कार,स्वयंसिध्दा,गॉड ऑफ अर्थ, ‘मी पदवीधर’ असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.कै.खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष असल्याने त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम त्या राबवत असतात. रोटरी क्लब, सामाजिक संस्थांमधून त्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून त्या कट्टर अजित पवार समर्थक म्हणून ओळखल्या जातात