२६ ऑगस्ट रोजी भारतीय विद्या भवन मध्ये ‘गंधर्व सख्यम’

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ःऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गंधर्व सख्यम ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनीवार,२६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे. आगामी संस्कृत दिनाचे औचित्य साधून ‘गंधर्व सख्यम ‘ म्युझिकलमधील तसेच ‘संस्कृतश्री’ या यू-ट्यूब चॅनल वरील गाजलेल्या अप्रतिम गीतांचे सादरीकरण होणार आहे,.

‘संस्कृतश्री’ संस्थेची ही निर्मिती असून ‘ईको रिगेन’,स्वप्नील जोशी यांनी निर्मिती सहाय्य केले आहे. प्रांजल अक्कलकोटकर आणि डॉ. श्रीहरि गोकर्णकर यांची संकल्पना असून संगीत प्रांजल अक्कलकोटकर यांचे आहे.संस्कृत काव्ये ‘ करव्दयम्’ यांची आहेत.अखिलेश काकडे,रोहित शिळीमकर, सई जोशी,प्रज्ञा प्रभुदेसाई, सई जोशी,सनिका जोशी,प्रा.आशुतोष नाईक ,डॉ. श्रीहरि गोकर्णकर आणि प्रांजल अक्कलकोटकर सहभागी होणार आहेत. नृत्य अरूजा रहाळकर,ऋतुजा शिंदे यांचे आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७८ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

Latest News