भाजपाचे नेते आमदार विजयकुमार गावित यांच्या विरुद्ध जोडे मारो आंदोलन-


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -पुणे- शहर महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी कांग्रेस भवनाच्या बाहेर भाजपाचे नेते आमदार विजयकुमार गावित यांच्या विरुद्ध जोडे मारो आंदोलन करण्यात आले.परवा एका कार्यक्रमात भाजपा आमदार विजयकुमार गावीत यांनी महिलांविरुद्ध टिपण्णी केली होती त्याचा निषेध करण्यात आला .
मच्छी खा आणि चिकणी दिसा म्हणजे मुली पटविता येतील ‘ या भाजपा नेत्यांची आयडिया आणि स्लोगन सध्या बदलले आहे बेटी बचाव बेटी पढाव हे स्लोगन बदलून बेटी को मच्छी खिलाव और चिकणी बनाव और फिर पटाव हे नविन स्लोगन तयार झाले आहे.. या नेत्यांच्या घरी आयाबहिणी आहेत का नाही ही शंका येते
शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा संगिता तिवारी म्हणाल्या,’भाजपा आमदार विजयकुमार गावीत यांनीअभद्र टिपण्णी केली ; जर मुली आणि महिलांनी मच्छी खाल्ली त्यांची स्कीन चिकणी होते व त्या चिकण्या दिसतात.आणि मग त्या पटवता येतात;
तसेच अमिताभ बच्चन यांच्या सूनबाई ऐश्वर्या बच्चन राय यांच्यावरही केली. त्यांच्या मते ऐश्वर्या राय रोज मच्छी खाते म्हणून तिचे डोळे खूप सुंदर आहेत आणि तिही सुंदर दिसते
भाजपानेते सध्या महिला-मुली यांच्यावर सतत अभद्र लज्जास्पद घाणेरडी टिपण्णी करत असतात. कायम महिलांचा अपमान करणे,भाषणामध्ये अश्लील बोलणे हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्यांचे दिल्लीचे नेते यावर काही बोलत नाहीत या मनुसंस्काराच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेस या विजयकुमार गावितला कांग्रेस भवनाच्या बाहेर जोड्याने मारले
भाजपा विरोधात घोषणाबाजी केली यावेळी माजी महापौर रजनी त्रिभुवन, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, नानी राजगुरू, सीमा महाडिक, सुवर्णा माने, रजीया बल्लारी,अनुसुया गायकवाड, सुंदर ओव्हाळ, नंदा ढावरे, रमा भोसले, कांता ढोणे,संतांन पिल्ले,सोनिया ओवाळ, ताई कसबे, गीता तारु ,दिंगाता ओव्हाळ, गौरी काळे महिला उपस्थित होत्या