चांद्रयान-3′ ची चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-3’ ची चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाली आहे. त्यामुळे भारतासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशस्वी लँडिंगमुळे भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान-3’ मधील लँडरचे यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग झाले आहे. चंद्रावर यशस्वीपणे लँड होणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. अंतराळाच्या इतिहासात भारताने हा नवा इतिहास रचला आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्समधून सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे”मी सध्या ब्रिक्समध्ये आहे. मात्र, प्रत्येक भारतीयांसारखे माझे मन देखील ‘चांद्रयान -3’ मध्ये गुंतलेले आहे. यासाठी ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार मानतो.
140 जनतेला कोटी-कोटी धन्यवाद देतो. ज्या ठिकाणी कुणीही गेले नाही तेथे आपण गेलो, आपल्या शास्त्रज्ञांचे परिश्रम प्रेरणादायी आहेत”, अशा शब्दात मोदींनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले ज्यावेळी आपण घडताना पाहतो, तेव्हा जीवन धन्य होते. हा क्षण अविस्मरणीय आहे.
हा क्षण अद्भुत आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्याच्या जयघोषाचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या आशेचा आहे. हा क्षण नव्या उर्जेचा असून नव्या भारताचा आहे, असेही मोदी म्हणाले.
अशोक चव्हाण
भारताची मान जगात उंचावणारा क्षण आज देशाने अनुभवला. `चंद्रयान-३`, ही मोहीम इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखवली. परंतु यावरूनही आता राजकारण सुरू झाले आहे. (Ashok Chavan On Chandrayaan-3) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत `चंद्रयान -३`, हा तर नेहरूंच्या अभ्यासपूर्ण विचारांचा यशस्वी परिणाम असल्याचे म्हटले आहे. हे सांगतांना त्यांनी आतापर्यंतच्या अंतराळ मोहीमेची यादीच दिली आहेआपल्या ट्विटमध्ये म्हणतात, चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोचे हार्दिक अभिनंदन. भारतातील लोकांसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे महान शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाची सुरुवात करणारे आमचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जी यांच्या अभ्यासपूर्ण विचारांचा हा आणखी एक यशस्वी परिणाम आहे.इस्रोची उपलब्धी : १९६२ भारत सरकारने अंतराळ संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय समिती (INCOSPAR)स्थापन केली. १५ ऑगस्ट १९६९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ची स्थापना झाली. १९७२ साली भारत सरकारने ISRO मार्फत भारतीय अंतराळ कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी अंतराळ विभाग (DOS)ची स्थापना केली. १९ एप्रिल १९७५ रोजी भारताच्या पहिल्या उपग्रह ‘आर्यभट्ट’चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याने भारताने जगात मोठा इतिहास रचला आहे. त्यावरयांनी प्रतिक्रिया दिली आहे
.
१८ जुलै १९८० मध्ये भारताचे पहिले प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन SLV-3E2 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले आणि रोहिणी उपग्रह RS-1 कक्षेत ठेवले. ३० ऑगस्ट १९८३ साली भारताचा पहिला संचार उपग्रह INSAT-1B प्रक्षेपित केला गेला, ज्याने ७ वर्षांचे आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले. १७ मार्च १९८८ मध्ये IRS-1A,स्वदेशी अत्याधुनिक रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या मालिकेतील पहिला, ध्रुवीय सूर्य-समकालिक कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
२० मे १९९२ ला ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल ASLV-D3, वैज्ञानिक उपकरणांसह SROSS-C उपग्रह घेऊन जाणारे तिसरे विकासात्मक उड्डाण यशस्वीरित्या केले. १५ ऑक्टोबर १९९४ साली भारताचे तिसर्या पिढीचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV-D2 यशस्वीरित्या IRS-P2 उपग्रहासह प्रक्षेपित झाले. २६ मे १९९९ मध्ये जर्मनी आणि रिपब्लिक ऑफ कोरियाचे दोन उपग्रह प्रक्षेपित करून उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश
१८ एप्रिल २००१ मध्ये भारताचे पहिले जिओ-सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV)यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले ज्याने प्रायोगिक कम्युनिकेशन उपग्रह, GSAT-1 वाहून नेला. २२ ऑक्टोबर २००८ मध्ये चांद्रयान-1 ग्रहांच्या निरीक्षणासाठी चंद्राच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मार्स ऑर्बिटर मिशन स्पेसक्राफ्ट ग्रहांच्या निरीक्षणासाठी मंगळाच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. तर १८ डिसेंबर २०१४ रोजी क्रू मॉड्युल अॅटमॉस्फेरिक री-एंट्री एक्सपेरिमेंट (CARE)चाचणी वाहन ‘गगनयान’ यशस्वीरित्या लाँच करण्यात आले. १५ फेब्रुवारी २०१७ मध्ये एकाच मोहिमेत १०४ उपग्रह प्रक्षेपित केले आणि एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
२२ जुलै २०१९ मध्ये चांद्रयान-२ ग्रहांच्या निरीक्षणासाठी चंद्राच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. १४ जुलै २०२३ म्हणजे मागच्या आठवड्यात चांद्रयान-३ ग्रहांच्या निरीक्षणासाठी चंद्राच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले आणि शेवटी आज ते घडताना दिसलं. इतिहास घडवू शकतो हे कौतुकास्पद आहे. हा सर्व टप्पा यशस्वीपणे गाठल्याबद्दल मला आमच्या शास्त्रज्ञांबद्दल अत्यंत आदर आहे. मी त्यांना भविष्यातील प्रकल्पांसाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही आशा करतो की ते जगाला प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात चव्हाण यांनी आजच्या यशाचे श्रेय काॅंग्रेसलाच असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.