राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पक्षात आपण हे ‘हेकेखोरपणा’ करतात – अश्विनी कदम


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडून पक्ष फुटल्यानंतरही मूळ राष्ट्रवादीचे म्हणजे, शरद पवारांकडच्या पुण्यातील नेते, पदाधिकाऱ्यांना ‘शहाणपण’ आलेले नाही. बंडखोरांना म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाला आव्हान देण्याची भाषा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि याच गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी कदम यांच्यातील मतभेदांनी टोक गाठले आहे
पुण्यात राष्ट्रवादी ची ताकद अजूनही असून, पक्षाचे आजघडीला ४०-४५ नगरसेवक निवडून येतात. हा पक्ष विरोधी बाकांवर होता. याच ताकदीच्या पक्षाला गेली अनेक वर्षे गटबाजीने पोखरले आहे. त्यात पक्षाचीच पिछेहाट झाली; तरीही गटातटाचे राजकारण थांबले नाही.
अशातच आता पक्षात राज्य पातळीवरच फाटाफूट झाली. त्यानंतर पुण्यातील पक्षाच्या माजी नगरसेवकांत गोंधळ आहे. ‘कोणी निष्ठेचा; तर कोणी बंडाचा’ झेंडा हाती ठेवला आहे. त्यात शहराध्यक्ष जगताप आणि अश्विनी जगताप या आता तरी, मूळ म्हणजे, थोरल्या पवारांकडे आहेत. मात्र, याच दोघांमधील जुन्या वादाला नवे वळण मिळाले असून, त्यातून संतापलेल्या अश्विनीताईंनी जगतापांच्या पक्षात मनमानी करीत असल्याचा आरोप केला आहे.
.
शहराध्यक्षांच्या ‘वर्किंग स्टाईल’वर आक्षेप घेत, अश्विनीताईंनी ‘धमकी’च दिली आहे. ‘पक्षात आपण हे ‘हेकेखोरपणा’ करीत आहात. मीडियापुढे जाऊन तुमचा कारभार उघड करणार असल्याचा ‘मेसेज’ धाडून अश्विनीताईंनी जगतापांना इशारा दिला. अश्विनीताईंच्या या ‘मेसेज’ला ‘लाईक’ करून जगतापांनीही ‘काय करायचे ते करा’, अशाच भाषेत उत्तर देऊन टाकले
. परंतू, अश्विनीताईंचा बंडखोर स्वःभाव जाणून असलेल्या जगतापांनी त्यांचे ऑफिस गाठून समझोता करण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी केला. मात्र, पक्षाच्या पडझडीत या दोघांमधील वादाचा भडका उडाल्याने त्याच्या झळा संघटनेला बसू शकतो राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत नवे पदाधिकारी निवडले जात आहेत. त्यात मूळ पक्षात अश्विनीताईंना पर्वतीची जबाबदारी हवी आहे. त्यासाठी त्या आग्रही असून, हे पद घेऊन पर्वती विधानसभा मतदारसंघ पुन्हा बांधण्याचा त्यांचा हेतू आहे.
त्यावर चर्चा करण्यासाठी अश्विनीताई गेल्या काही दिवसांपासून जगतापांची वेळ मागत आहेत. मात्र, जगतापांच्या ‘बिझी शेड्युल’मुळे त्यांनी अश्विनीताईंना भेटीची वेळ दिली नसावी. त्यानंतर गेल्या आठवड्यांत त्यांनी जगतापांना चारवेळा फोन केला. तो जगतापांनी घेतला नाही. त्यानंतर भडकलेल्या अश्विनीताईंनी जगतापांना मोजक्याच; पण अत्यंत कडवट शब्दांत ‘मेसेज’ पाठविला. त्यात, शहराध्यक्ष म्हणून ज्या पध्दतीने काम करीत आहात, त्याबाबत जाणार असल्याचे अश्विनीताईंनी ‘मेसेज’मधून जगतापांना कळविले
त्यानंतरही जगताप काही डगमगले नाहीत. उलटपक्षी अश्विनीताईंचा ‘मेसेज‘ लाईक केला. मात्र, बेधडकपणे बोलून मोकळे होणाऱ्या अश्विनीताई चांगल्या ठाऊक असलेल्या जगतापांनी सावध पवित्रा घेतला आणि ताईंची भूमिका ऐकण्यासाठी जगतापांनी बुधवारी दुपारी सवड काढली.महापालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्तेत जगताप महापौर होते.
त्याआधी अश्विनीताई स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या. या काळातही या दोघांमधील मतभेद कधीच लपून राहिले नव्हते. राष्ट्रवादीतील बंडानंतरही जगताप आणि अश्विनीताईंमधील वाद शमला नाही. मुळात, पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी नेत्यांनी एकत्र येण्याची अपेक्षा असतानाच या दोघांमधील राजकीय संघर्षाला धार आली.