PUNE: पती आणि पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना…

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

पतीने पैशाच्या हव्यासापोटी मला मारहाण केली आणि जबरदस्तीने उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे केले होते, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचेही तिने सांगितले.  पती एवढ्यावरच थांबला नसून त्याने आदित्य गौतम आणि  सुजित पुजारी यामध्ये सहभागी करुन घेतले. दोघांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेतले आणि त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी केल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे.  पती आणि पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. लग्नावेळी सात फेरे घेताना पती पत्नीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण पुण्यातील एका नराधम पतीने चक्क आपल्या पत्नीचा उपयोग वेश्या व्यवसायासाठी केल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील हडपसर येथून ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. पीडित महिला ही तिच्या पती सोबत उंड्री येथे राहायला आहे.  तिच्या नवऱ्याला पैसे कमावण्याची लालसा होती. या लालसेपोटी त्याने आपल्या पत्नीला दोन मित्रांच्या मदतीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. अक्षय आवटे असे आरोपी पतीचे नाव असून तो 25 वर्षांचा आहे. यासंदर्भात पीडित पत्नीने आपल्या पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नवऱ्याच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे. नवरा सध्या जामिनावर बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन मित्रांची नावे समोर आली आहेत. पहिला आदित्य गौतम हा कसबा पेठ येथे राहत असून दुसरा आरोपी सुजित पुजारी हा आंबेगावचा रहिवाशी आहे.यानंतर दोघांनी आपल्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. एवढेच नव्हे तर आपण रस्त्याने जात असताना पतीच्या या दोन मित्रांनी अडवले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. 

Latest News