अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत सरकार सकारात्मक महिला बाल कल्याणमंत्री अदिती तटकरे


मुंबई : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या बाबतचे निवेदन राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री मा.ना.अदिती तटकरे यांना भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालयात देण्यात आले. लवकरच या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत बैठक घेऊन दिलेल्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मा ना अदिती तटकरे यांनी दिले
असल्याचे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्षा सुरेखा गायकवाड यांनी कळविले. या वेळी त्यांच्या सोबत शाकीरा सय्यद ,ललीता खांदे, कविता पाथरुट, शालन कटरे, इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महत्वपूर्ण मागण्या-
1) मानधन एकत्रित व नियमीतपणे मिळावे.
2) कामगारांना पेंशन व ग्रजुईटी मिळावी
3) मोबाईल चांगल्या दर्जाच्या मिळावेत. रिर्चाज ची रक्कम वाढविण्यात यावीत , परिवर्तन निधी वाढवून मिळावेत.
4) पर्यवेक्षक भरती मध्ये एम. एस . डब्ल्यू. ला प्राधान्य देण्यात यावे, तसेच अनुभव व शिक्षण या नुसार भरती करण्यात यावी.
अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.