मूलभूत अधिकार हे भारतीय घटनेचे बलस्थान!: प्रा अविनाश कोल्हे


पुणे : ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-
‘मूलभूत अधिकार हे भारतीय घटनेचे बलस्थान आहे. भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकारांचे कवच लाभले आहे. या अधिकारांचा सतत अभ्यास करुन त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी कार्यरत राहिले पाहिजे’, असे प्रतिपादन प्रा. अविनाश कोल्हे यांनी केले.’
आरक्षणामुळे मागास वर्गाला न्याय देता आला. कलम १६ नुसार संधी मिळू लागली. कलम १८ नुसार रावबहादूर सारख्या पदव्या खालसा झाल्या.नागरी पुरस्कार सुरू झाले.कलम १९(१) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, कोठेही निवास – व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य मिळाले.सर्व प्रकारची स्वातंत्र्य आहेत, पण ते घटनेच्या चौकटीत राहून आहेत.
घटनेने काही न्याय्य, वाजवी बंधने घातली आहेत.ती समजून घेतले पाहिजे.धर्म निवडण्याचे , प्रसाराचे स्वातंत्र्य आहे.सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार कलम २९,३० नुसार दिलेले आहेत.चुकीच्या कायद्याचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे
.तसेच कलम ४५ नुसार मोफत, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने शनिवार,२६ ऑगस्ट २०२३ रोजी पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये ‘मूलभूत अधिकार आणि वाजवी निर्बंध’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले
.हा अभ्यास वर्ग शनिवार, २६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता गांधी भवन,कोथरूड येथे झाला.हा पाचवा संविधान अभ्यास वर्ग होता.डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे, नीलम पंडित आदी उपस्थित होते.मूलभूत अधिकार मध्ये आर्थिक अधिकार दिलेला नाही. हे अधिकार आणीबाणीत रद्द करता येत होते, असेही प्रा. कोल्हे यांनी सांगितले.