पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक, सीएनजी बसेस वरील कंत्राटी चालकांनी पुकारलेला संप मागे

पुणे-( ऑनलाइन परिवर्तनाचा सामना) –
पुणे स्टेशन व वाघोली डेपोकडील कंत्राटी चालकांनी रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारनंतर संप मागे घेतला. खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांनी पुकारलेल्या संपाचा पीएमपीएमएल च्या बससेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने महामंडळाकडील चालक खासगी बसेसवरती नेमून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली होती
.ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणूनपुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारे जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले
.खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएल च्या बससेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले.
ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील कोथरूड, पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील कंत्राटी चालकांनी पुकारलेला संप मागे घेतला.