मला धमक्या देऊ नका… मी डरपोक नाही, गुडघे टेकणारा माणूस नाही- खासदार संजय राऊत


पुणे (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना)
– सामानातील अग्रलेखावरून. अग्रलेखातील भाषेवरून अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना सुनावले होते. खासदार संजय राऊतते म्हणाले की, राऊतसाहेब आपण सर्वज्ञ आहात. आपल्या दिनक्रमाची सुरुवात लोकांच्या शिव्या खाऊन होते. यापुढे आमच्या नेत्यावर आपण टीका केली तर जशास तसे उत्तर तुम्हालाही भेटेल.
अजित पवार यांचे राज्याच्या राजकारणात काय योगदान आहे, कोरोना काळातील काय योगदान आहे, हे तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारा खासदार संजय राऊत यांना आमचा शेवटचा प्रेमळ सल्ला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करू नका; अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला होता. त्यावर संजय राऊत चांगलेच भडकले. मला धमक्या देऊ नका. माझ्या नादाला लागाल, तर तुमच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, असा प्रतिइशाराच राऊतांनी चव्हाण यांना दिला
जेव्हा तुमचे नेते घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होते, तेव्हा दररोज सकाळी सात वाजता मंत्रालयात आणि फिल्डवर पोचून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काम करीत होते. तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशी बोला, असे सूरज चव्हाण यांनी राऊतांना सुनावले होते.सूरज चव्हाण यांच्या इशाऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले की, मी कधीही खालच्या भाषेत बोलत नाही. आजच्या अग्रलेखात खालच्या पातळीवर काय आहे, हे मला दाखवलं तर मी राजकारण सोडेन. तुम्ही पक्ष फोडणाऱ्याला निधी देता आणि जे एकनिष्ठ आहेत, त्यांना तुम्ही निधी देत नाही. निधी हवा असेल तर आमच्या गटात या, असे तुम्ही सांगता बोलत असतानाच राऊत एकाकी चिडले आणि म्हणाले की, मला धमक्या देऊ नका… मी डरपोक नाही आणि एजन्सीला घाबरून गुडघे टेकणारा माणूस मी नाही. मी पळपुटा नाही. माझ्या नादाला लागाल ना, तर तुमच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. मला धमक्या देऊ का