२४ सप्टेंबरला राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर सूचक मेळावा…


ऑनलाइन परिवर्तनाचा सामना –
समर्थ ब्राह्मण वधुवर सूचक केंद्राच्या वतीने विवाहेच्छूकांना माहिती मिळावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. लोकांच्या आग्रहामुळे मंडळातर्फे वधू वर सूचक मेळावा घेतला जात आहे.
समर्थ ब्राह्मण वधुवर सूचक केंद्राच्या वतीने रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी ब्राह्मण वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगरमधील समर्थ नगर (औरंगाबाद) येथील श्री समर्थ राम मंदीर, (वरद गणेशच्या मागे) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य भरातून या मेळाव्याला वधू वर व पालक उपस्थित राहणार आहेत.
रविवार, दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून मेळावा सुरू होईल.
या मेळाव्यात प्रथम वधू वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर, दिव्यांग यांची नावनोंदणी सुरू असून, परिचय करून दिला जाईल.

आपला मुलगा किंवा मुलगी लग्नाची असेल तर निश्चितच त्यास या मेळाव्याचा फायदा होऊन आपला जीवनसाथी भेटेल असा पुरेपूर विश्वास वाटतो.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी योगदान प्रत्येकी रु. ६००/- राहील. त्यात उमेदवार व अजून एका पालकाला प्रवेश दिला जाईल. उमेदवार व सोबतच्या एका पालकाला दोन वेळा चहा आणि एक वेळ पुरी- भाजी चे जेवण दिले जाईल. जर उमेदवाराबरोबर अजून कुणी पालक असेल तर रु. १००/- वेगळे योगदान द्यावे लागेल.
नोंदणी फाॅर्म आणि अधिक माहितीसाठी आयोजक ॲड. प्रज्ञा गिरधारी ( मो. 78757 88529) यांच्याशी संपर्क साधता येईल.
ॲड. प्रज्ञा गिरधारी
संचालिका, समर्थ वधुवर सूचक केंद्र, औरंगाबाद
मो. 78757 88529