हिंदुस्थानचं मणिपूर आणि हरियाणा होण्यापासून रोखण्यासाठी INDIA आघाडी जिंकलीच पाहिजे- एमके स्टॅलिन

ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- भाजपने आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन यांच्या पॉडकास्ट मालिकेच्या पहिल्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केल्याबद्दल निंदा केली. प्रत्येकाच्या खात्यात ₹ 15 लाख जमा केले जातील असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी कधीही दिलं नाही, पक्षानं सांगितलं की पॉडकास्टमधील दावे ‘खोटे’ आहेत.आश्वासनाप्रमाणे सर्व नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा झाले नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं नाही, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलं होतं पण झालं नाही, असं म्हणत स्टॅलिन यांनी भाजपवर चौफेर हल्लाबोल केला.हिंदुस्थानचं मणिपूर आणि हरियाणा होण्यापासून रोखण्यासाठी INDIA आघाडी जिंकलीच पाहिजे, असं स्टॅलिन म्हणाले. यावेळी त्यांनी मणिपूर आणि हरियाणातील घटनांचा उल्लेख केला. यावर्षी मे महिन्यापासून ईशान्येकडील राज्यात मोठ्या प्रमाणात वांशिक हिंसाचार आणि धार्मिक मिरवणुकीनंतर हरियाणातील अलीकडील जातीय हिंसाचाराचा उल्लेख स्टॅलिन यांनी केला.मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी – चार वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पॉडकास्ट भागात, स्टॅलिन यांनी दावा केला की केंद्रातील भाजपनं गेल्या नऊ वर्षात समाजकल्याणाच्या संदर्भात कोणतेही निवडणूकपूर्व आश्वासन पूर्ण केलं नाही.एमके स्टॅलिन यांनी पुढे लोकांना ‘बहुसांस्कृतिक आणि वैविध्यपूर्ण हिंदुस्थानची निर्मिती’ करण्याचं आवाहन केलं आणि आरोप केला की भाजप सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उद्ध्वस्त करून, मित्रांच्या खिशात टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. तसेच अशा मुद्द्यांवर पांघरूण घालण्यासाठी जातीयवादाचा अवलंब करत असल्याचा आरोप केला.INDIA आघाडीनं शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत जाहीर केलं की ते भाजपचा सामना करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढतील.बैठकीच्या ठरावात म्हटलं आहे की पक्ष मीडिया रणनीतीत समन्वय राखतील आणि ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया