युनायटेड वेस्टर्न बँक व आयडीबीआय बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे अधिवेशन संपन्न…


पुणे-ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-
युनायटेड वेस्टर्न बँक व आयडीबीआय बँक निवृत्त कर्मचारी संघटना यांचे २६ वे वार्षिक अधिवेशन सातारा येथील स्वराज सांस्कृतिक भवन सातारा येथे नुकतेच संपन्न झाले.अधिवेशनास संपूर्ण भारतातुन ५०० च्या वर सदस्य उपस्थित होते.ह्या राष्ट्रीय अधिवेशन उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा येथील प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ व विचारवंत डाॅ.प्रसन्न दाभोळकर हे होते.त्यांनी आपल्या भाषणात निवृत्तांनी व ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-
कौटुंबिक सुसंवाद वाढविण्यासाठी आपली मनोभूमिका चांगली ठेवावी व आपल्या स्वभावात सकारात्मक बदल घडवावा.निरामय व निकोप आयुष्य जगण्यासाठी अनेक महत्वपूर्ण सुचना केल्या.हे सांगत असताना त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देवुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.ज्येष्ठांनी वागण्यात अलिप्तता ठेवुन,हे माझे आहे हा विचार सोडून शांतपणे वाचन, मनन ,आत्मचिंतन करण्याचे शिकले पाहिजे.अधिकारी संघटनेचे माजी सचिव दत्ताजी भिडे,सातारा यांनी सातारकरांच्या वतीने संपूर्ण भारतातून आलेल्या सर्व उपस्थित सदस्यांचे स्वागत केले.
संघटनेचे सरचिटणीस एस. जी.चौधरी यांनी प्रास्ताविक करुन संघटनेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ए.के.कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या स्थापनेपासूनचीं वाटचाल,प्रगती व संस्थेची उद्दिष्टे व त्याप्रमाणे चालणारे कामकाज यांची माहिती दिली.व संघटना करीत असलेल्या सदस्यासाठीच्या कल्याणकारी योजनांची व करत असलेल्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती दिली.
ज्या सभासदांची वयाची ७५ वर्ष पुर्ण झालेली आहेत त्यांचा संघटनेतर्फे शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला व त्यांच्या दिर्घायु आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.संघटनेचे उपाध्यक्ष श्री आष्टेकर यांनी बँकेने,कर्मचाऱ्याना २३ महिन्याचा पगार फरक ताबडतोब देण्याविषयी मागणी केली व कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत सोमण यांनी प्राॅव्हिडन्ट फंड घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा (सेकंड ऑप्शन) दुसरा पर्याय देण्याविषयी ठराव मांडले व ते एकमताने पारित केले.
सन २०२३ ते २०२५ दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवड झाली. निवडणुक अधिकारी म्हणुन राजाभाऊ परांजपे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचलन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय बॅंकेचे निवृत्त अधिकारी व्ही.डी.कुलकर्णी यांनी करुन दिला. त्यांनी विविध उदाहरणे देऊन व संतांची वचने उदघृत करून कार्यक्रमाची वैचारिक उंची वाढविली.दुपारच्या सत्राचे सुत्रसंचलन सुर्यकांत वझे यांनी केले व नरेश बिंदू यांनी आभार प्रदर्शन केले. त्या नंतर चाळीसगाव येथील सद्स्य श्री. कुलकर्णी यांनी वंदेमातरम् म्हटल्यानंतर अधिवेशनाची सांगता झाली.
अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्यकारिणी सदस्य तसेच सातारा येथील कार्यकर्ते बेलागडे,
सुर्यकांत देशमुख,प्रविण देशपांडे,ताथवडेकर,ं मराठे,प्रकाश शहाणे,लोखंडे, अशोक कुलकर्णी,शशिकांत पंडीत यांनी परिश्रम घेतले.