गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी येथे मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने कृत्रिम मूर्ती विसर्जन हौद आयोजन…

पिंपरी प्रतिनिधी- (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-) आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी येथे मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने कृत्रिम मूर्ती विसर्जन हौद व संकलन केंद्राचे मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ आयोजन करण्यात आले आहे.
याविषयी माहिती देताना वाघेरे म्हणाले कि ,नदीपात्रामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात येत असते. त्यामुळे नागरिकांच्या भावनेचा विचार करत पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व नागरिकांसाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संदीप वाघेरे जनसंपर्क कार्यालय समोरील जागेमध्ये कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन हौद व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी ३०x १०० आकाराचा मंडप उभारण्यात आला आहे. सहा मीटर लांबीचे शुद्ध पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आलेले आहे. तसेच लोकभावनेचा आदर करीत केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या गणेश मूर्ती मोशी येथे महापालिकेने ठरवून दिलेल्या खाणी मध्ये वाहतूक करून विसर्जित केल्या जाणार आहेत

. मागील वर्षी केंद्रामध्ये ५००० पेक्षा जास्त मूर्ती विसर्जित व संकलित झाल्या होत्या. सदर केंद्राचा नागरिकांनी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे

. तसेच विसर्जन केंद्रावर येताना नागरिकांनी सर्व शासकीय तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे तसेच अधिक माहितीसाठी श्री.गणेश मंजाळ ७९७२२९८०५३ व रंजनाताई जाधव ९७६६४८७२३६यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

Latest News