अजित पवार हे राष्ट्रवादीतील एकमेव चांगलं काम करणारे नेते – अमृता फडणवीस

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

– अजित पवार चोवीस तास काम करतात, कामाप्रती ते समर्पित आहेत. कामाच्याबाबतीत अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांचे भाऊ आहेत. ते राष्ट्रवादीतील एकमेव चांगलं काम करणारे नेते आहेत. सध्या ते या बाजूनं आहेत याचा आनंद आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे

दरम्यान, “पुण्यातील गणेशोत्सवाबाबत बोलताना फडणवीस म्हणाल्या, खुप आनंद होतोय, महाराष्ट्रात आनंदाच वातावरण आहे. पुण्यात आले आज लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव पुण्यातूनच सुरू केला तिथेच मी एक गाणं म्हणतेय. मी प्रत्येकासाठी साकडं घातलं आहेदेवेंद्र फडणीस आहेत तिथे छान काम करत आहेत. त्यांनी अजून चांगलं काम करो, शून्यापासून तिथं काम करायला हवं. नागपूरच्या परिस्थितीवर देवेंद्र फडणवीसांचं लक्ष आहे. नागरिकांचा तिथं रोष आहे हे खरंय त्यांना प्रॉब्लेम झालाय ही गोष्टही खरी आहे,

पण तिथं नियोजन केलं जात आहे. काही तासात जास्त पाऊस होतो, अशा वेळी काय करायचं? याचं नियोजन केलं पाहिजे अशा शब्दांत पावसाच्या समस्येवरही अमृता फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादीवर सडकून टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांच्या या विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

Latest News