AIADMK पक्षाने भाजपसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा केला निर्णय….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
AIADMK च्या निर्णयामुळे तमिळनाडूमध्ये भाजपला हातपाय पसरणे अवघड जाणार आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एआयएडीएमके पक्षाने भाजपसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएडीएमके पक्षाने भाजप आणि एनडीएसोबतचे कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याबाबत पक्षाच्या बैठकीत ठराव मंजूर केला आहे
AIADMK समन्वयक के पी मुनुसामी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाने हा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.
पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
.एनडीएसोबत अधिकृतरीत्या एआयएडीएमकेने सर्व संबंध तोडले आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाकडून वारंवार एआयएडीएमकेच्या माजी नेत्यांवर टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना हा निर्णय आला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंयतमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी वारंवार एआयएडीएमके पक्षातील दिवंगत नेत्यांवर टीका केलीये. त्यांनी पक्षाचे मार्गदर्शक दिवंगत माजी मुख्यमंत्री सीएन अन्नादुराई आणि माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अन्नमलाई यांनी माफी मागावी अन्यथा भाजपने पक्ष नेतृत्व बदलावं अशी मागणी एआयएडीएमके पक्षाने केली होती. त्यानंतर अखेर संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.