ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून कोटीचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ससून हॉस्पीटलच्या गेटवरून अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी रात्री उशिरा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल 1 किलो 75 ग्रॅम वजनाचे 2 कोटी रूपये किंमतीचे एमडी जप्त केले आहे. या माहितीला गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे. ससून हॉस्पीटलच्या गेटवर मोठा अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत
.ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का या अनुषंगाने देखील (Pune) तपास सुरू आहे.या मेफिड्रोनची किंमत तब्बल 2 कोटी आहे. हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे.ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.