लोणावळा शहरामध्ये पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पुण्यातील लोणावळा या पर्यटन शहरामध्ये पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा शनिवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्याचबरोबर बालकांसह महिलेचे अपहरण करून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडून घरातील काम करून घेणाऱ्या आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळीला पकडून दोन बालकांसह एका महिलेची सुटका केली आहे

या टोळीमध्ये एकूण दहा जणांचा समावेश आहे. यामध्ये दोन अल्पवयीन, तीन महिला, पाच पुरूष यांचा समावेश आहे तर यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर अल्पवयीन मुलांना येरवडा येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

इतर सहा आरोपींचा शोध चालू आहे. राज सिद्धेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे या दोन अटक आरोपींना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे

. अन्य दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना येरवडा येथील निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यातील काही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले

, लोणावळा परिसरातील कांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मारहाण करून लुटमार करतात अशी माहिती मिळाली होती. त्याचबरोबर त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांच्यावर बलात्कार करून मारहाण करून डांबून ठेवण्यात आले, अशी माहिती मिळाली होती.

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व लोणावळा पोलीसांनी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी राज सिदधेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे यांना ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता राज शिंदे याने पर्यटकांना चाकू व कुऱ्हाडीने मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे कपडे, मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.

जबरदस्ती घरात काम करायला लावलेल्या महिलेची सुटका देखील पोलिसांनी केली आहे. तर त्या महिलेस लोणावळा स्टेशनच्या परीसरातून चाकूचा धाक दाखवून घरी कोंडून ठेवले, तिच्याजवळचा मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेण्यात आली.

तिला मारहाण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून लोणावळा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोस्टे गु.र.नं. 410/2023 भा.दं.वि.का.क.376 (ड),376 (2) (एन),394,344, 363,324,323,504, 506,34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे

.तर पिडीत महिलेसोबत दोन अल्पवयीन मुलांची (मुलगी आणि मुलगा) सुटका करण्यात आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क केला त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.409/2023 भा.दं.वि.का.क.376 (ड),376 (2) (एन),394,344, 363,324,323,504, 506,34 पोक्सो अॅक्ट कलम 4,6,8,10,12 सह अल्पवयीन न्याय कायदा कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest News