महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण सर्वांना माहिती….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पण आज महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे असं आमचे लोक सांगतात त्यात तथ्य आहे असेही शरद पवार म्हणाले
आगामी निवडणूकीत जुन्नर तालुक्यातून शरद पवार गटाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना निवडणूकांना अजून वेळ असल्याचे सांगितलं.
जुन्नर तालुक्यातील लोकांशी माझा अनेक वर्षातील अनुभव आहे ते सहसा माझ्या शब्दाला कधी नकार देत नाहीत असेही शरद पवार म्हणालेराष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार यावरून पक्षातील दोन गटात वाद सुरू आहे. अजित पवार गटातील नेते अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला जात आहे.
यादरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणी भाष्य केलं आहे. जुन्नरमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना शरद पवारांनी इतरही वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं.राष्ट्रवादी कोणाची या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी महाराष्ट्रात फिरतोय सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे
. सामान्य लोक काय विचार करतो हे महत्वाचं आहे. काल किल्लारीत होतो. तेथे २० हजार लोकं होते. राज्यात सगळीकडे हे चित्र दिसतंय. वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छीत नाही.
आगामी निवडणूकीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि ज्या पक्षाचा मी संस्थापक आहे तो पक्ष एकत्रित सामोरे जाणार आहोत. त्याच्यामध्ये आमचं जे सुत्र आहे त्यानुसार जुन्नरची जागा ही ज्याचा मी अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल.