विजेची थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यांना डांबले


पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरातील डेक्कन भागातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेची थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याची घटना डेक्कन परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, पाच हजारांची लाईटबील थकल्याने वीज तोडणीसाठी आलेल्या महिला अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार पुण्यातील डेक्कन परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरती बोदे यांची 5 हजार 206 रुपयांची वीजबिल थकले होते. यामुळेच बोदे यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ही थकबाकी मागण्यासाठी आलेल्या करुणा आधारी व रूपाली कुटे या वीज वितरणाच्या दोन महिला अधिकाऱ्यांसोबत या कुटूंबाचा याच वादातून आरोपींनी महिलांना शिविगाळ करत त्यांना डांबून ठेवले.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये कुत्री सोडली. यानंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना फोन लावून मदत मागितली
.डेक्कन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलांची सुटका केली. या प्रकरणी ललित बोदे व आरती बोदे या दांपत्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.