कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात…


पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)
कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना सोळा नंबर या वार्ड क्रमांक मध्ये ठेवले जाते.याचा सोळा नंबर वार्ड मध्येच हे कुख्यात आरोपी तळ ठोकून आहेत.या मध्ये माजी आमदार अनिल भोसले ,पुण्यातील कुख्यात गुंड रुपेश कृष्णराव मारणे , प्रसिद्ध रोझरी स्कूलचा मालक विनय आरणा आणि खंडणी प्रकरणातील आरोपी हेमंत पाटील सुद्धा ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली तळ ठोकून आहेत .
राज्यभरात कल्याण मुंबई मटका चालवणारा मटका किंग विरल सावला हा उपचाराच्या नावाखाली पुण्यातील ससून रुग्णालयात आहेत.तो रुग्णालयामध्ये तब्बल 274 दिवस तळ ठोकून आहे. कोल्हापूरचा मटका किंग सलीम मुल्ला याच्यावर कोल्हापूर पोलिसानी मोक्का अंतर्गत कारवाईत केली होती या गुन्हात विरल सहआरोपी आहे.विरल सावला याला कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला होता. सावला हा तीव्र उच्च रक्तदाबाच्या नावाखाली तब्बल 274 दिवस ससून रुग्णालयात तळ ठोकून आहे.
त्याचबरोबर हरिदास कोंडीबा साठे , प्रवीण राऊत, आदित्य दादा मारणे, शिवाजी ज्ञानोबा दोरगे हे कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात आहेत.